Kavi Gress 
६ मार्च आज कवी ग्रेस यांचा स्मृतीदिन...

दुःख

विकायला आज
निघालो मी व्यथा
जुनी माझी कथा
कोण घेई ?

तुझ्या बाजाराचे
वेगळेच भाव
कसे माझे घाव
संपतील ?

हाडांच्या भिंती
मातीच्या या घरा
दुःखाचा हा भारा
कोण घेई ?

कोण घेई माझ्या
ओसाडचा भोग
त्याच्या घरा आग
लागायची ?

म्हणूनच माझी
दुःखावर माया
वेगळीच काया
हवी मला !

-ग्रेस

ते स्वतःच म्हणतात  - 'मी महाकवी दुःखाचा, प्राचीन नदी परि खोल...'
https://www.instagram.com/s_u_m_i_t_c_h_a_v_a_n/
Kavi Gress
Udgivet:

Kavi Gress

Udgivet: