Sumit Chavan's profile

MARATHI BHASHA DIN

माझ्या मातीचे गायन, तुझ्या आकाश श्रुतींना 
जरा कानोसा देऊन कधी ऐकशील का रे
माझी धुळीतील चित्रे, तुझ्या प्रकाश नेत्रांनी 
जरा पापणी खुलून कधी पाहशील का रे  
माझ्या जहाजाचे पंख, मध्यरात्रीत माखले 
तुझ्या किनाऱ्यास दिवा कधी लावशील का रे 
माझा रांगडा अंधार,मेघामेघात साचला 
तुझ्या उषेच्या ओठांनी कधी टिपशील का रे 

-कुसुमाग्रज 

हळुवार, गोड, लाघवी, प्रेमळ शब्दांनी सजणारी आणि प्रसंगी वज्राहूनी कठीण शब्दांनी वार करणारी! जिथे फक्त शब्दच भावनांना वाट मोकळी करून देतात... शब्द मनामनांतील कप्पे व्यापतात... व्यापून उरतात...  सगळं काम फक्त शब्दच करतात... ना कुठल्याही शस्त्रांची गरज ना कुठल्याही लाघवाची! अशी ही माझी मायबोली... माझी मराठी भाषा!
MARATHI BHASHA DIN
Published:

MARATHI BHASHA DIN

Published: