Sheetal Sonar's profile

Aksharkalawari 2021 (अक्षरकलावारी)

Aksharkalawari (अक्षरकलावारी)announcement poster
कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करताना, इष्ट देवतेला नमस्कार करण्याची पद्धत आहे. वारकरी संप्रदायाच्या घोषवाक्याने २०२१ च्या #अक्षरकलावारी ची सुरुवात
तुकोबाराय त्यांच्या मनोविश्वा चे वर्णन करताना सांगतात माझ्या सर्व ज्ञानेंद्रियांना विठ्ठलच जाणवतो आहे.
वारीला जाणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यांची भावना त्यांनी जणू मांडली आहे. दर वर्षी देहुवरून पंढरीच्या वारीची सुरुवात होत असते. #अक्षरकलावारी
ज्ञानदेव म्हणजे माय मराठीचे हृदय ! वारी मध्ये मी का असावं? तर पंढरपूर माझं माहेर आहे आणि विठोबा माझी माऊली, एखादी सासुरवाशीण माहेरी जाते तिच भावना ज्ञानोबा या अभंगात व्यक्त करतात .
ज्या परब्रम्हातून ओमकराचा जन्म झाला तेच रूप पंढरीत कंबरेवर हात ठेऊन विटेवर प्रकटले आहे. त्याचे दर्शन घेताना भक्त, पांडुरंग आणि भक्ती या गोष्टींचे द्वैत लयास जाऊन पांडुरंगाच्या सर्वव्यापीपणाची प्रचिती येते.#अक्षरकलावारी
संत नामदेवांनी विठुरायाच्या रुपातले मातृत्व जाणले, मायलेकराचा बंध त्यांनी विठुभक्तित अनुभवला.नामदेव दरवाजा पंढरपुरात अजूनही नामदेवांच्या समर्पित विठ्ठलभक्तीची साक्ष देतो.#अक्षरकलावारी
जनाबाईंनी देवाला मानवीय पातळीवर कल्पून भक्तिमार्गातील परमोच्च भावना व्यक्त केल्या. पांडुरंगाचे आणि तिचे अद्वैत सांगताना कधी ती त्याच्यावर रागावते तर कधी त्याच्या काळजीने व्याकूळ होते.#अक्षरकलावारी
परमेश्वराच्या सर्वात जवळ जाणारा भक्तिमार्ग म्हणजे प्रत्यक्ष जवळीक नसून त्याचे नामस्मरण आहे. नरहरी सोनार सांगतात,अज्ञानाची रात्र सरली आणि ज्ञानसूर्याच्या प्रकाशात दिवस सुरू झाला तरी माझं हरीचं भजन कधीच सुटलं नाही!#अक्षरकलावारी
अचल, अविकारी शिवाचे अविरत घडत राहणारे नवदर्शन म्हणजेच हे जग आणि त्यांतील व्यवहार. विठ्ठलाचे वर्णन करताना मुक्ताई म्हणतात की त्याचा काही थांग लागत नाही, समजून घेऊ तेवढा जास्त उमगत जाणारा हा पांडुरंग आहे!#अक्षरकलावारी
वारकरी संप्रदाय हा त्या काळातील एक बंड होतं, चोखोबांना सामाजिक वर्णव्यवस्था आणि विषमतेमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागला, इतर संतांप्रमाणे उराउरी भेटावे असे खूप वाटे परंतु ते सावळे गोजिरे रूप महाद्वारातून पहावे लागले. तरीही विठूभक्तीच्या आड यातील एकही गोष्ट आली नाही.#अक्षरकलावारी
गणिकेला कशाला हवाय नाही म्हणण्याचा, स्वतंत्र विचार करण्याचा हक्क? या समाज व्यवस्थेच्या विरोधात कान्होपात्रा बंड करून उभ्या राहिल्या, विटेवरील सावळ्या रूपाच्या ओढीने भक्तीमार्गावरून वाटचाल करून त्या संतपदाला पोचल्या.#अक्षरकलावारी
निवृत्तीनाथ कमी वयातच ज्ञानोबा, मुक्ताई सारख्या प्रज्ञावंत मुलांचे पालक झाले, वारकरी संप्रदायातील शैव वैष्णव भेद त्यांनी दुर केला. अद्वैताचा पुरस्कार करणारे निवृत्ती पुढे ज्ञानोबांचे गुरू झाले आणि भावर्थदीपिकेची प्रेरणा ठरले.#अक्षरकलावारी
छोटासा प्रयोग ओडिसी पट्टाचित्र लोककलेचा
प्रपंच करता करता परमार्थ साधता येतो याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे गोरोबा कुंभार, त्यांच्या अभंगात अद्वैताची अनुभूती प्रकटलेली दिसते. स्व सोबत संवादातून स्वतःचे मार्गदर्शक व्हा अशी त्यांची शिकवण आहे.#अक्षरकलावारी
संत सोपानदेवांचे अभंग म्हणजे आत्मभान जागी करणारी सूत्रे आहेत. विठ्ठल भक्तीने ओतप्रोत भरलेली शब्दरचना, साक्षात मुक्ती ला ही हेवा वाटेल असा आनंद.#अक्षरकलावारी
छोटासा प्रयोग बेसिक कॅलिग्राफी उभ्या स्ट्रोक्सचा
संत बंका म्हणजे चोखोबांचे मेव्हणे, घरातच विठ्ठलभक्ती असल्याने ते आपसूकच वारकरी संप्रदायाकडे ओढले गेले. सामाजिक विषमता शुध्द अशुध्द या गोष्टींचा त्रास त्यांनाही झालं, परंतु भागवत धर्माची पताका त्यांनी तळागाळात नेली. अभंगातून प्रबोधन घडवले.#अक्षरकलावारी
समाजातील जो वर्ग जास्त शोषित आहे, तोच कर्मकांड आणि अनिष्ट प्रथांच्या आहारी मोठ्या प्रमाणात जात असतो. संत निर्मळा यांनी विठ्ठलाचे नामस्मरण सोपे केले, त्यांच्या प्रयत्नांनी नामसाधना सर्वसमावेशक केली.#अक्षरकलावारी
Recreated Vincent van Gogh's "The Starry Night" in my style 😊
कर्ममेळा हे चोखोबांचे सुपुत्र, उत्कटता, सामाजिक आशय आणि बांधीव रचना हे त्यांच्या अभंगांचे वैशिष्ट्य होते. भक्तिरसाने ओथंबलेले त्यांचे अभंग वाचताना, विठ्ठलाचा अमूर्त साक्षात्कार होतो.#अक्षरकलावारी
समजाभोवती स्त्री पुरूष भेदभावाची घट्ट मगरमिठी असताना, बहिणाबाईंच्या कार्यास क्रांती म्हणणे योग्य ठरेल. मनातील आक्रोश त्यांनी कृतीत आणला, संघर्षा ऐवजी मतपरिवर्तन घडवले. हाच वारकरी विचारांचा मूळ गाभा आहे.#अक्षरकलावारी
साक्षात तुकोबारायांचा अनुग्रह असलेल्या संत निळोबारायांनी अनेक अभंग रचले. वैराग्यवृत्तिने कीर्तन साधनेतून त्यांनी लोकांना भक्तिमार्ग दाखवला. पंचोत्री, म्हणजेच १०५ अभंग रचले.#अक्षरकलावारी

सावता माळी हे कर्ममार्गी संत होते. अध्यात्म आणि भक्ती, आत्मबोध आणि लोकसंग्रह, कर्तव्य आणि सदाचार याची बेमालूम सांगड त्यांनी घातली. अंधश्रद्धा, दांभिकता आणि धर्माच्या अवडंबरावर त्यांनी नेहेमीच कोरडे ओढले.#अक्षरकलावारी
.
तुकारामांचे धाकटे बंधू म्हणून कान्होबांची भूमिका महत्त्वाची आहे, एखाद्या दीपस्तंभा सारखे ते आपल्याला अभंगांकडे पाहायला शिकवतात. आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी वाखरी मध्ये रिंगण असते, खेळकर भावनेतून जीवनाकडे पाहण्याचा संदेश रिंगण देतं.#अक्षरकलावारी
अभंग आधी स्वत:साठी आणि मग जनांसाठी.. आत्मशुद्धी ते परमात्मा.. असा संत सोयराबाईचा विचार आहे. सोप्या शब्दातील त्यांचे अभंग, अगदी नेमकेपणाने सार समजावून सांगतात.#अक्षरकलावारी
Created poster for MYFM 
Aksharkalawari 2021 (अक्षरकलावारी)
Published:

Owner

Aksharkalawari 2021 (अक्षरकलावारी)

Published: